Loksabha 2019 : 'क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी'; काँग्रेसची स्मृती इराणींवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उमेदवार आहेत. पण त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधत पुन्हा एकदा टीका केली आहे. 

काल (ता. 11) इराणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण न झाल्याचा उल्लेख केला आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा आपण परदेशातील विद्यापिठातून पदवी मिळवली असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेच्या शिर्षकगीतावरून पुन्हा एकदा ट्रोल केले व 'क्योंकि मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थी' अशा आशयाची नवीन मालिका टिव्हीवर येणार असल्याचे उपरोधात्मकरित्या सांगितले. त्या म्हणाल्या की, पदवीचे स्वरूप सारखे बदलते, एक पदवी येते, एक पदवी जाते, नवीन एफिडेविट तयार केले जातात, त्याचप्रमाणे अशी नवीन मालिकाही येईल अशी टीका केली. 

स्मृतू इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून यापूर्वीही वाद झाले होते. आता या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने पुन्हा एक नवीन वाद उफाळून आला आहे. मागच्या लोकसभा निवडणूकीत राहुल गांधी यांनी अगदी काही फरकाने इराणी यांना पराभूत केले होते. त्यामुळे आगामी निवडणूक पुन्हा एकदा चुरशीची ठरणार. 

Web Title: Congress spoke person Priyanka Chaturvedi criticized Smriti Irani on Graduation

संबंधित बातम्या

Saam TV Live