आम आदमी पक्षाचे आमदारांच्या घरात सापडली अडीज कोटींची रक्कम

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी (ता. 8) रात्री उशीरा छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी 2.56 कोटी रुपयांची रोकड आढळून आली असून, ती जप्त करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने शुक्रवारी (ता. 8) रात्री उशीरा छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी 2.56 कोटी रुपयांची रोकड आढळून आली असून, ती जप्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्राप्तीकर विभागाने छापा टाकल्याने आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. बाल्यान हे उत्तर नगर मतदारसंघाचे आमदार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या अध्यक्षांनी ज्या जागेवर छापेमारी केली होती. तिथे बाल्यान दोन कोटी रुपये घेऊन आले होते. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. छापेमारी करण्यात आलेले ठिकाण हे प्रदीप सोलंकी नावाच्या प्रॉपर्टी डीलरचे कार्यालय असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलंकी यांचे निधन झालेले आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाल्यान यांच्यासोबत त्यांच्या एका नातेवाईक तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्तिकर विभागातील आठ अधिकारी आमदार बाल्यान आणि सोलंकी यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करीत आहेत. अधिकाऱ्यांनी जप्त केलेली रक्कम ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर याचा तपास अधिकारी करत आहेत. नरेश बाल्यान राहत असलेल्या परिसरातही छापेमारी सुरू आहे. आम आदमी पक्षाकडून याबाबत कोणतेही विधान करण्यात आले नाही. लोकसभा निवडणूकांपूर्वी केली गेलेली ही छापेमारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Web Title: delhi raid the income tax department at the aaps mla house cash seized of 2 5 crore


संबंधित बातम्या

Saam TV Live