अभिनंदन यांचा वायूदलाकडून होणार गौरव, गणवेशावर लागणार 'हा' बॅज

अभिनंदन यांचा वायूदलाकडून होणार गौरव, गणवेशावर लागणार 'हा' बॅज

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचा हल्ला परतवून लावताना शौर्य गाजवले. शौर्य गाजवणाऱ्या अभिनंदन यांच्या मिग-21 बायसन स्क्वॉर्डनचा भारतीय वायूदलाकडून गौरव करण्यात येणार आहे. अभिनंदन यांची स्क्वॉर्ड्रन यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' या नावाने ओळखली जाणार असून, त्यांच्या गणवेशावर हा बॅज लावण्यात येणार आहे.

बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला प्रतिहल्ला परतवून लावताना अभिनंदन यांनी आपल्या मिग-21 विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानचे अद्यायावत तंत्रज्ञान असलेले एफ-16 विमान पाडले होते. मिग-21 बायसन विमानांच्या जोरदार प्रतिहल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानी विमानांनी तत्काळ पळ काढला होता. यामध्ये अभिनंदन वर्धमान यांच्या 51व्या स्क्वॉर्डने महत्वाची भूमिका बजावली होती. एफ-16 या विमानाला फाल्कन या नावानेही ओळखले जाते. स्लेयर्सचा अर्थ वध करणारा असा होतो. त्यामुळे अभिनंदन यांची स्क्वॉर्ड्रन यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' या नावाने ओळखली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्वॉर्डनमधील जवानांच्या गणवेशावर यापुढे 'फाल्कन स्लेयर्स' आणि 'एमराम डोजर्स' हे दोन बिल्ले लावले जातील. 'एमराम डोजर्स'चा संबंधही एफ-16 विमानांशी आहे. या विमानांमध्ये एमराम ही अद्यायावत क्षेपणास्त्रे असतात. हल्ल्याच्यावेळी पाकिस्तानच्या एफ-16 विमानातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. मात्र, भारताच्या मिग-21 बायसन आणि सुखोई विमानांनी या क्षेपणास्त्राला यशस्वीपणे गुंगारा (डॉज) दिला होता. अद्यायावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली एमराम क्षेपणास्त्रे आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी ओळखली जातात. मात्र, भारतीय वैमानिकांच्या कामगिरीमुळे हे क्षेपणास्त्र वाया गेले होते. त्यामुळे 51व्या स्क्वॉर्डनमधील जवानांच्या गणवेशावर 'एमराम डोजर्स' हा बिल्लादेखील लावला जाईल.

अभिनंदन यांनी अतुलनीय शौर्य दाखवत मिग-21 बायसन या तुलनेने जुन्या विमानाच्या साहाय्याने अद्यायावत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या एफ-16 विमानाला धूळ चारली होती. यावेळी अभिनंदन यांचे मिग-21 विमानही पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळले होते. यावेळी पाकिस्तानी नागरिकांनी अभिनंदन यांना मारहाण केली होती. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले अभिनंदन यांची 60 तासानंतर सुटका झाली होती.

Web Title: IAFs tribute to Wing Cdr Abhinandan Varthaman and squadrons get Falcon Slayer

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com