'अभिनंदन तूम्ही जे केले ते सर्वांनाच शक्य नाही'

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 मार्च 2019

नवी दिल्लीः पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि पाकिस्तानने पकडल्यानंतर दाखवलेल्या धाडसाबद्दल हवाई दलाने त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. हवाई दलाने ट्विटरवरून अभिनंदन यांच्यावर एक कविता करून ती पोस्ट केली आहे.

नवी दिल्लीः पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि पाकिस्तानने पकडल्यानंतर दाखवलेल्या धाडसाबद्दल हवाई दलाने त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. हवाई दलाने ट्विटरवरून अभिनंदन यांच्यावर एक कविता करून ती पोस्ट केली आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी 27 फेब्रुवारीला भारतीय हद्दीत अमेरिकेने दिलेली एफ-16 ही विमाने घुसवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावताना पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडले होते. पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-21 हे विमानही पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. विंग कमांडर हे पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरले होते. परंतु, ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्याने त्यांना पाकिस्तानी नागरिकांनी मोठी मारहाण केली होती. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांची नागरिकांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर त्यांच्याकडून व्हिडिओ शूट करून घेतले होते.

पाकिस्तानने अभिनंदन यांच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु अभिनंदन यांनी हा मनसुबा मोठ्या हुशारीने आणि खंबीरपणे उधळून लावला. पाकिस्तानच्या छळाला अभिनंदन हे मोठ्या धाडसाने सामोरे गेले होते. पाकिस्तानने तीन दिवसानंतर अभिनंदन यांची सुटका केली होती. जगातील महत्त्वाच्या देशांच्या दबावानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने तीन दिवसानंतर भारताच्या ताब्यात दिले.

View image on Twitter

View image on Twitter

Indian Air Force@IAF_MCC

सबके बस की बात नहीं

जो किया तुमने अभिनंदन,
वह सबके बस की बात नहीं।
आखेटक का किया आखेट,
यह सबके बस की बात नहीं।...

... जननी, जन्मभूमि का गौरव हो तुम,
सर्वोच्च शिखर पर तुम्हें बिठाते हैं।
जो तुम कर पाए एक जीवन में,
वह सबके बस की बात नहीं। -- विपिन 'इलाहाबादी'.
Jai Hind

17.9K

6,052 people are talking about this

Twitter Ads info and privacy

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसावर हवाई दलाने स्तुतिसुमनं उधळली आहेत. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, तू जे केलं अभिनंदन, हे सर्वांनाच शक्य नाही. शिकाऱ्याचीच केली शिकार, हे सर्वच करू शकत नाहीत....

भारतीय हवाई दलाने देशभक्तीपर कविता पोस्ट करून पाकिस्तानला ट्रोल केले होते. 27 फेब्रुवारीला विपीन इलाहाबादी यांनी ही कविता लिहिली होती...

View image on Twitter

View image on Twitter

Indian Air Force@IAF_MCC

हद सरहद की

आज किसी ने सरहदें पार की,
क्योंकि किसी ने सारी हदें पार की।
उस लड़ाकू में, जिसका अर्थ मृगमरीचिका है,
एक हक़ीक़त, गयी रात हमने बयाँ की।
आज किसी ने सरहदें पार की...

. .. विपिन 'इलाहाबादी', २७ फरवरी २०१९

23.4K

9,133 people are talking about this

Twitter Ads info and privacy

Web Title: indian air force salutes wing commander abhinandan varthaman with a poem at twitter


संबंधित बातम्या

Saam TV Live