देशातील बेरोजगारीचा दर अनपेक्षितपणे 7.6 टक्के

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 मे 2019

नवी दिल्ली : देशातील घटत्या रोजगारांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 7.6 टक्‍क्‍यांवर गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालाद्वारे उघड झाले आहे. ऑक्‍टोबर 2016 नंतर हा उच्चांकी दर असल्याचे "सीएमआयई'ने म्हटले आहे. 

मार्च महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर अनपेक्षितपणे 6.7 टक्के राहिला. मात्र, एप्रिल महिन्यात त्यात लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे "सीएमआयई'चे प्रमुख महेश व्यास यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. "सीएमआयई'च्या अहवालानुसार, एप्रिलमध्ये शहरातील बेरोजगारीचे प्रमाण 7.5 टक्के, तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण 7.7 टक्के आहे. तत्पूर्वी फेब्रुवारीत हा दर 7.2 टक्के होता. "सीएमआयई'ने जानेवारीत जाहीर केलेल्या अहवालात नोटाबंदीनंतर 2018 मध्ये 1.1 कोटी जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचा दावा केला होता. 

दरम्यान, देशात सध्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून, विरोधी पक्षांनी रोजगारनिर्मितीचा मुद्दा उचलून धरला आहे. अशातच जाहीर झालेली ही आकडेवारी मोदी सरकारसाठी धक्कादायक मानली जात आहे. 

Web Title: Indias April unemployment rate increases to 7.6 percent says CMIE

संबंधित बातम्या

Saam TV Live