समुद्र मार्गी दहशदवादी हल्ला होण्याचा इशारा : नौदल प्रमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 मार्च 2019

नवी दिल्ली- दहशतावाद्यांना समुद्र मार्गानं घुसून हल्ला कसा करायचा? याचं पूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे, असे नौदल प्रमुख सुनिल लांबा यांनी म्हटलं आहे. आपला शेजारील देश समुद्र मार्गानं हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचं लांबा यांनी सांगितले.

दहशतवाद्यांना पाकिस्तान पैसा पुरवत आहे. त्यामुळे जगासमोर मोठं आव्हान उभं असल्याचं देखील नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पाकिस्तानविरोधात एअर स्ट्राईक करत भारतानं 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जम्मू-काश्मीरमध्ये देखील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. तसेच, दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य आता देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये देखील वळवला आहे. गुप्तचर विभागानं सूचना दिल्यानंतर प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशा वेळी नौदल प्रमुख सुनिल लांबा यांच्या असे बोलण्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर आता हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Sunil Lamba Intelligence Reports Major Terrorist Attack by Maritime Routes

संबंधित बातम्या

Saam TV Live