लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दणदणीत विजय मिळवू : देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

नवी दिल्ली : ज्या ठिकाणी भाजप उमेदवार असेल त्याच तेथेच मेहनत घेऊ नका मित्र पक्ष शिवसेनेसह एनडीएचे उमेदवारांनाही निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करा अशी सूचना भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याचे स्पष्ट करतानाच लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दणदणीत विजय मिळवू असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काल (रविवारी) दिल्लीत महाराष्ट्र प्रदेश भाजपची सुकाणू समितीची बैठक झाली यावेळी अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना दिली.

ते म्हणाले, "" शहा यांच्याबरोबर विधानसभा निवडणुकीची व्यूहरचना आणि पुन्हा सत्ता कशी राखायची याबाबतच्या तयारीवर या बैठकीत चर्चा झाली. केवळ भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत न घेता मित्रपक्षांसाठीही तितकीच मेहनत घ्या अशा सूचना शहा यांनी दिल्या आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही दणदणीत विजय विजय मिळविण्यासाठी शिवसेनेसह मित्रपक्ष हातात हात घालून मेहनत घेतील.'' 

महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणात चार महिन्यानंतर निवडणुका होत आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकांसदर्भात भाजप अध्यक्ष शहा यांनी काल बैठक घेतली. 

Web Title : As loksabha we will win Legislative Assembly too : Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Saam TV Live