भाजप खासदाराचा बाईक रॅलीमध्ये लष्कराचा गणवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 मार्च 2019

नवी दिल्ली - भाजप खासदार आणि दिल्ली भाजप प्रमुख असलेले मनोज तिवारी यांनी काल यमुना विाहार येथे झालेल्या प्रचाराच्या बाईक रॅलीमध्ये लष्कराचा गणवेश घातला. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. 

एनएनआय या वृत्तसंस्थेने मनोज तिवारी यांचे गणवेश घातलेले फोटो ट्विट केले आहे. भाजपकडून देशभर विजय संकल्प बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलिमध्ये त्यांनी अशा प्रकारे लष्कराचा गणवेश घालून सहभाग घेतला. त्यामुळे भारतीय लष्कराचे राजकारण केल्याचा आणि लष्कराचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माध्यम सल्लागार नागेंद्र शर्मा यांनी अशा प्रकारे लष्कराचा गणवेश घालणे गुन्हा असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, मला आपल्या लष्कराचा अभिमान आहे. मी लष्करात नसलो तरी मी, माझ्या एकात्मितेच्या भावना याद्वारे व्यक्त करत होतो. याला अपमान का म्हणावे ? असे तिवारी यांनी म्हटले आहे. 

Web Title: manoj tiwari trolled on social media after campaigning in army uniform

संबंधित बातम्या

Saam TV Live