राफेल गैरव्यवहारात मोदींचा थेट सहभाग होता : राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा उचलून धरले. 'राफेल गैरव्यवहारात मोदींचा थेट सहभाग होता,' असे वक्तव्य राहुल गांधींनी नुकतेच केले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा उचलून धरले. 'राफेल गैरव्यवहारात मोदींचा थेट सहभाग होता,' असे वक्तव्य राहुल गांधींनी नुकतेच केले आहे.

नवी दिल्लीत राहुल गांधीनी पत्रकार परिषद घेतली. येथे ते बोलत होते. राफेल घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठीच त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. 'हिंदु' दैनिकाच्या वृत्ताचा आधार घेत मोदींवर राहुल गांधी यांनी टिकास्त्र सोडले. पुढे ते म्हणाले, 'राफेल प्रकरणी नरेंद्र मोदींनी 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानीला दिले. या प्रकरणात खुद्द मोदींनी प्रत्यक्ष सौदा केला. मोदी यांनी वायुसेनेचे 30 हजार कोटी चोरले आहे. सरकारला आमच्यापैकी ज्यांच्यावर कारवाई करायची आहे त्यांच्यावर करावी, पण राफेल वर उत्तर टाळू नये, उत्तर द्यावे.'

'चौकीदार चोर है'चा पुर्नउच्चार करीत राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफ डागळली. त्यांनी 30 हजार कोटीचा राफेल व्यवहार झालेले दस्ताऐवज दाखविले. ज्यात, नरेंद्र मोदी यांनी व्यवहारात हस्तक्षेप केला, हे स्पष्ट लिहीले असल्याचेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाशी केंद्र सरकार खोटे बोलले आहे. पंतप्रधान, संरक्षणमंत्री खोटे बोलत आहेत. संरक्षण मंत्रालयाचा मोदींच्या सहभागावर आक्षेप होता. तरीही मोदीं व्यवहारात सहभागी झाले.'

राफेल वरुन राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा निशाणा साधला. सोबतच, 'पर्रिकरांना भेटलो पण राफेल बाबत कोणतीही चर्चा केली नाही,' असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.
 

Web Title: Modi was directly involved in Rafael mismanagement: Rahul Gandhi


संबंधित बातम्या

Saam TV Live