काँग्रेसच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या यादीत १८ उमेदवारांचा समावेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी शुक्रवारी रात्री जाहीर केली असून, यामध्ये 18 उमेदवारांचा समावेश आहे.

काँग्रेसने यापूर्वी दोन याद्या जाहीर केल्या असून, सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील उमेदवारांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत तेलंगणातील आठ, आसाममधील पाच, मेघालयातील दोन, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. 

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांना सिलचरमधून, तर गौरव गोगई यांना आसाममधील कलियाबोर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. हे दोघेही सध्या खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील बाराबंकी मतदारसंघातून ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांचा मुलगा तनुज पुनियाला उमेदवारी देण्यात आली आहे. के. एल खिस्ती यांना नागालँडमधून आणि भारत बासनेत यांना सिक्कीममधून उमेदवारी जाहीर केली. 

तेलंगणामधून रमेश राठोड (दिलाबाद), ए. चंद्रशेखर (पेड्डापल्ले), पूनम प्रभाकर (करीमनगर), के. मदन मोहन राव (जहीराबाद), गली अनिल कुमार (मेडक), ए. रेवंथ रेड्डी (मल्कानगिरी), कोंडा विश्वेवर रेड्डी (चेवल्ला) आणि पोरिका बलराम नाईक (मेहबुबाबाद) यांना उमेदवारी देण्यात आली. 

Web Title: Mukul Sangma Among Others In Congress Third Candidates List For Lok Sabha Polls

संबंधित बातम्या

Saam TV Live