लोकसभेचा प्रचार संपताच नमो टिव्ही स्विच ऑफ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 21 मे 2019

नवी दिल्ली : सोशल मीडियात आघाडीवर राहिलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी नमो टिव्ही सुरु करून प्रचाराचा धडाका लावला होता. आता लोकसभेचा प्रचार संपताच नमो टिव्ही बंद करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियात आघाडीवर राहिलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी नमो टिव्ही सुरु करून प्रचाराचा धडाका लावला होता. आता लोकसभेचा प्रचार संपताच नमो टिव्ही बंद करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा आणि निवडणुकीचे संदेश नमो टिव्हीवरून प्रसारित करण्यात येत होते. भाजपने सुरु केलेले हे चॅनेल अखेर लोकसभेचा प्रचार संपताच बंद केले आहे. लोकसभेचा अखेरच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी झाले. त्याचा प्रचार 17 मे रोजी संपला त्याच दिवशी भाजपने नमो टिव्हीचे प्रसारण बंद केले. 31 मार्चपासून सुरु झालेले हे चॅनेल कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिले होते. विरोधकांनी याबाबत निवडणूक आय़ोगाकडे तक्रारही केली होती. त्यानंतर आय़ोगाने या चॅनेलवरून निवडणूक संबंधी बातम्यांचे प्रसारण करण्यापासून मनाई केली होती.

याविषयी बोलताना एका भाजप नेत्याने माहिती दिली, की भाजपच्या प्रचाराचे माध्यम म्हणून नमो टिव्ही सुरु करण्यात आला होता. निवडणूका संपताच याची काही गरज नसल्याचे लक्षात आल्याने 17 मे पासून या चॅनेलचे प्रसारण सर्व स्तरातून बंद करण्यात आले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना म्हटले होते, की निवडणूक रोख्यांपासून ते मतदान यंत्रांपर्यंत आणि निवडणूक वेळापत्रक, नमो टीव्ही, 'मोदींचे सैन्य' आणि आता केदारनाथ यात्रा या प्रत्येक बाबीत निवडणूक आयोगाने मोदी आणि त्यांच्या गॅंगसमोर साफ शरणागती पत्करलेली दिसली आहे.

Web Title: NaMo TV Channel disappears from all platforms as Lok Sabha election ends


संबंधित बातम्या

Saam TV Live