स्टार्ट अप साठी नवी वाहिनी सुरु करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जुलै 2019

अर्थसंकल्प 2019: स्टार्ट अपसाठी सरकारने एक विशेष चॅनेल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना नवीन स्टार्ट अप सुरु करायचे आहे अशा लोकांना याचा फायदा मिळणार आहे. शिवाय तरुणांना यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सरकारने शिक्षणावर विशेष लक्ष दिले असून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. येत्या काळात  भारताला उच्च शिक्षणाचा केंद्र बनविणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. उच्च शिक्षणासाठी 400 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. 

 ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात 19 हजार 351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक 3 हजार 661 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.

स्कील इंडिया आणि स्टार्ट अपसाठी मोठ्या घोषणा: 
स्कील इंडियाच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी सरकार मदत करणार आहे. यासाठी तरुणांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे. शिवाय सरकार आर्थिक मदत देखील करणार आहे. आतापर्यंत स्टार्ट अप इंडिया योजनेतून अनेकांना फायदा झाला आहे. तसेच स्टँडअप योजनेतून दोन वर्षांत तीनशे उद्योजक निर्णाण झाले. 

स्टार्ट अपची सुरवात 

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने 16 जानेवारी 2016 पासून देशभरात ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. एकूण 19 कृती आराखड्यानुसार सुरु असलेल्या या कार्यक्रमावर देखरेख ठेवणा-या केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग  राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहीर करत असते. या यादीत देशातील 29 राज्ये आणि 7 केंद्रशासीत प्रदेशांची आकडेवारी जाहीर करण्यात येते. 

ठळक मुद्दे: 
- शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार
- भारताला उच्च शिक्षणाचा केंद्र बनविणार
- उच्च शिक्षणासाठी 400 कोटींचा निधी
- स्कील इंडियाच्या माध्यमातून स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी मदत करणार
- स्टार्ट अपसाठी एक नवे टिव्ही चॅनेल सुरु कऱण्यात येईल
- स्टार्ट अप सुरु करण्यासाठी सरकार करणार मदत, तरुणांना मदत मिळणार
- स्टार्ट अप इंडिया योजनेतून अनेकांना फायदा झाला

Web Title: new tv channel for start up business

संबंधित बातम्या

Saam TV Live