ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जून 2019

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजस्थानमधून खासदार झालेले ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत राजस्थानमधून खासदार झालेले ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संघपरिवार व मोदींची महत्त्वाकांक्षी विधेयके, भाजपची विक्रमी सदस्यसंख्या व काँग्रेससह विरोधकांचेही तुलनेने किंचितसे वाढलेले बळ लक्षात घेता 'डोक्‍यावर बर्फ व तोंडात साखर' असणाऱ्या ज्येष्ठ खासदाराची नियुक्ती सरकारकडून करण्यात येईल, अशी शक्यता होती. पण, भाजपकडून राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आल्याची शक्यता आहे. राधामोहनसिंह, ज्युएल ओराम, मनसुखभाई वसावा व मेनका गांधी ही नावे चर्चेत होती. उत्तर प्रदेशातील देवरियाचे खासदार व ज्येष्ठ भाजप नेते रमापती राम त्रिपाठी यांच्यासारख्या नावांचीही चर्चा होती. पण, मोदी सरकारने 'धक्कातंत्रा'चा वापर बिर्ला यांना निवडण्याचे निश्चित आहे. 

याबाबत बिर्ला म्हणाले, की मला याबाबत अद्याप माहिती नाही. कार्यकारी अध्यक्षपदी निवड झालेल्या जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. 

उद्या (बुधवारी) नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल. भाजप संसदीय मंडळात आज नव्या सभापतींच्या नावाबद्दलही चर्चा झाली. मात्र, त्याबाबत आताच पत्ते उघडण्यात आलेले नाहीत. सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे तिकीट भाजपने वयाच्या अटीनुसार कापले. मेनका गांधी यांच्यानंतरचे सर्वांत ज्येष्ठ सदस्य (सात वेळा खासदार) असलेले वीरेंद्र कुमार यांना हंगामी अध्यक्ष बनविल्याने त्यांचे नाव या पदासाठी विचारत घेतले जाण्याची शक्‍यता नाही.

परंपरा आहे, नियम नाही 
पहिल्यांदाच खासदार बनलेले अध्यक्ष झालेच नाहीत, असेही नाही. तशी परंपरा असली, तरी लोकसभेचा तसा नियमही नाही. माजी अध्यक्ष मनोहर जोशी तसेच बलराम जाखड व जी. एम. सी. बालयोगी ही उदाहरणे याबाबत घेतली जातात.

Web Title: Om Birla likely to be next Lok Sabha Speaker in Parliament


संबंधित बातम्या

Saam TV Live