बालाकोटच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे मृतदेह अजूनही तसेच?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 मार्च 2019

नवी दिल्ली : भारताने हवाई हल्ले केलेल्या बालाकोट येथील मदरशाला भेट देण्यास पत्रकारांना आज पाकिस्तानने रोखल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता भारताने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह तेथे तसेच पडून असल्याने माध्यमांना रोखण्यात आल्याची चर्चा सूरु आहे.

पाकिस्तानने माध्यमांना बालाकोटमध्ये जाण्यासाठी गेल्या नऊ दिवसांतील ही तिसरी वेळ आहे.

भारताने जैशे महंमदच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले केले होते. मात्र पाकिस्तानने सुरवातीला असा काही हल्ला झालाच नाही, असे म्हटले होते. आता गेल्या नऊ दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानने बालाकोट येथे जाण्यापासून प्रसार माध्यमांना रोखले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेलाही हल्ल्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आमचे काहीही नुकसान झाले नाही, जगभरातल्या प्रसार माध्यमांनी हल्ल्याच्या जागी येऊन खुशाल खात्री करावी, असे म्हटले होते. आता मात्र पाकिस्तानी लष्कराने प्रसार माध्यमांना रोखल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: pakistan prohibit media going in balakot

संबंधित बातम्या

Saam TV Live