आश्वासन देऊनही दहशतवाद्यांवर कारवाई केली नसल्याने पाकड्यांचा खोटारडेपणा चालू आहे: परराष्ट्रमंत्रालय
नवी दिल्ली - भारताने केलेल्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानने पाकिस्तानने अनेक दावे केले. त्यातच आम्ही शांतताप्रिय असून, दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासनही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाने दिले होते. प्रत्यक्षात मात्र पाकिसत्नाने याबाबत कोणतिही कारवाई केलेली नाही. यामुळे भारताबाबत पाकिस्तान सतत खोटारडेपणा करत असल्याचा आरोप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. दिल्ली येथे परराष्ट्र मंत्र्यालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

याशिवाय, पुरावे देऊनसुद्धा पाकिस्तान एफ16 विमान भारताकडून पाडण्यात आल्याचे मान्य करत नसल्याचे कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भारताने एकच विमान गमावले असून, दोन विमाने गमावल्याचा दावा खोटा असल्याचेही ते म्हणाले.
जैशेने पुलवामा हल्याची जबाबदारी घेतली. तरी पाकिस्तान त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तयार नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची कबुली दिली होती. मात्र त्यानंतर सहा मार्चला पाक सैन्याच्या प्रवक्त्यांनी मात्र जैशैचे पाकिस्तानात अस्तित्व असल्याचे नाकारले. त्यामुळे पाकिस्तानचा दुतोंडीपणा पुन्हा समोर आला असल्याचे कुमार म्हणाले.
मुंबई हल्ल्यानंतरही पाकिस्तानने याचप्रकारे नकार दिला होता, याची आठवणही त्यांनी यावेळी बोलताना करुन दिली.
Web Title: Pakistan's behavior is like a terrorist's spokesperson