मोदींच्या फोटोशूट आणि भाजपचं स्पष्टीकरण

मोदींच्या फोटोशूट आणि भाजपचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी चुकीच्या बातम्या पसरवून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. पुलवामा हल्ल्यामुळे आपला देश दुःखात बुडालेला असताना राहुल गांधी यांच्याकडून चुकीच्या बातम्या पसरवून राजकारण करण्याने देशातील जनतेला आणखीनच दुःख सहन करावे लागत आहे, हे अत्यंत घृणास्पद असल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. त्याचबरोबर, राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर शेअर केलेले फोटो हे सकाळचे असल्याचे स्पष्टीकरणही भाजपने दिले आहे.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत देशासोबत खंबीर उभं राहण्याची गरज असताना काँग्रेस आपले खरे रंग दाखवत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. काँग्रेसला पुलवामा हल्ल्याची आधीच कल्पना होती का ? असा प्रश्नही भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच, जवानांच्या बलिदानावर राजकीय स्टंट करणे अत्यंत चुकीचे असून असे स्टंट लोकांच्या लक्षात येत असतात, त्यामुळे दुसऱ्या प्रकारचे स्टंट करून पाहण्याचा सल्लाही भाजपकडून राहुल यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, पुलवामात 14 फेब्रुवारीला दुपारी 'सीआरपीएफ'वर दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सायंकाळपर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणात मग्न होते,' अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विट करून केली होती. याला भाजपकडून ट्विटरवच प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Web Title: PM Modi's photos shared by Rahul Gandhi were shot in morning says BJP

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com