पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 च्या निवडणुकीच्या मोहिमेसह पुढे चालू आहेत : उमर अब्दुल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरुच ठेवला असून, यावरून असे दिसते की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान येत्या 24 ते 48 तासांत परत येतील. अन्यथा त्यांना याचे काही घेणंदेणं नाही हे स्पष्ट होते, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. या विमानांना पिटाळून लावण्यासाठी गेलेल्या भारतीय हवाई दलाचे एक विमान पाकिस्तानमध्ये कोसळले. पाकिस्तानने या विमानाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले आहे. अभिनंदन यांना परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. देशभरातून अभिनंदन यांना परत आणण्याची मागणी होत आहे. विरोधी पक्षांनीही सरकारकडे ही मागणी केली आहे.

उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत अभिनंदन हे परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सुखरूपपणे भारतात येत नाही तोवर पंतप्रधानांनी सर्व राजकीय व्यवहार थांबवावेत, तसेच विरोधी पक्षांनीदेखील दिल्लीतील बैठका रद्द कराव्यात, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले होते.

Web Title: PM Narendra Modi continuing with his Elections 2019 campaign is the surest sign says Omar Abdullah

संबंधित बातम्या

Saam TV Live