राजकीय पक्षांकडून प्रियांका गांधी आणि राहुल गांधींवर टीका 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 जानेवारी 2019

नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून त्यांच्यावर आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांची तुलना रावणाशी तर प्रियांका गांधी यांची तुलना शूर्पणखाशी केली आहे.

सुरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुरेंद्र सिंह यांना प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, ''राम आणि रावण यांचे युद्ध होणार होते. त्यावेळी या युद्धापूर्वी रावणाने आपली बहिण शूर्पणखाला पाठवले होते. तसेच आता रामाच्या भूमिकेत पंतप्रधान मोदी आहेत आणि रावणाच्या रूपात राहुल गांधी आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी शूर्पणखाच्या रूपात आपली बहिण प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवले आहे. 

दरम्यान, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये फक्त एससी/एसटी अॅक्टमुळे काँग्रेसला विजय मिळाला असून, काँग्रेस पक्ष एक तुटलेली नाव आहे, असेही सिंह म्हणाले. 

Web Title: Political parties criticize Priyanka Gandhi and Congress president Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Saam TV Live