माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हरियाणाच्या 201 9 मधील लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग भारतीय जनता पक्षाकडून रोहतक मतदारसंघाकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने दिली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

भाजपची रविवारी (ता. 3)  कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका नेत्याने दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत सेहवाग भाजपकडून राजकीय इनिंग सुरू करण्याची शक्यता आहे.

रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचे वर्चस्व आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून सेहवागला राजकीय मैदानात उतरवले जाऊ शकते. मात्र, सेहवाग अद्याप पक्षात दाखल झालेला नसून, असा कोणताही विचार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने लोकसभेच्या तिकीटाची ऑफर सेहवागला देण्याची जबाबदारी घेतली आहे.

दरम्यान, सेहवागने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अथवा ट्विट केलेले नाही. याबद्दल सेहवाग कोणता निर्णय घेणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे.

Web Title: The possibility of former player Virender Sehwag contesting from the Bharatiya Janata Party

संबंधित बातम्या

Saam TV Live