सामान्य माणूस ते केंद्रात मंत्रिपद असा प्रवास, ६४ वर्षीय प्रताप सारंगी झाले राज्यमंत्री

सामान्य माणूस ते केंद्रात मंत्रिपद असा प्रवास, ६४ वर्षीय प्रताप सारंगी झाले राज्यमंत्री

नवी दिल्ली - ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंत एका छोट्याशा झोपडीत राहत होते.. सायकलवर गावभर फिरायचे.. निवडणुकीच्या प्रचार त्यांनी चक्क रिक्षातून केला.. आता ते देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या संसदेत दाखल झाले आणि नरेंद्र मोदी यांच्या भक्कम सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं आहे.. नाव आहे प्रतापचंद्र सारंगी!

प्रताप सारंगी हे नाव तुम्हा-आम्हाला नवं आहे.. पण ओडिशातील नागरिकांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून सारंगी यांनी ओडिशातील बालासोर भागामध्ये अनेक सामाजिक कार्ये उभी केली. यापूर्वी ते दोन वेळा आमदारही झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले होते; पण १.४२ लाख मतांनी ते पराभूत झाले होते.

निवडणुकीतील विजय आणि पराभव अनेकांचं वागणं बदलण्यास कारणीभूत ठरतात. पण सारंगी याला सुखद अपवाद आहेत. त्यांनी पराभव सहज पचवला आणि त्यांच्या मूळ सामाजिक कामात गर्क झाले. यंदा भाजपने त्यांना पुन्हा तिकीट दिले. खुद्द नरेंद्र मोदी यांनी सारंगी यांच्यासाठी बालासोरमध्ये सभा घेतली होती.

मोदींचा करिष्मा आणि सारंगी यांची लोकप्रियता हे समीकरण यंदा जुळून आले. त्यांच्या विरोधातलं आव्हान कठीण होतं. कॉंग्रेसने नवज्योती पटनाईक या घराणेशाहीतील उमेदवाराला मैदानात उतरविले होते. बिजू जनता दलाचे उमेदवार रवींद्रकुमार जेना हेही तगड्या पार्श्वभूमीतून आलेले! या दोन्ही उमेदवारांनी महागड्या गाड्यांच्या ताफ्यासह थाटात प्रचार केला होता.. दुसरीकडे, सारंगी मात्र भाड्याने आणलेल्या रिक्षातून प्रचारासाठी फिरत होते.

निवडणुकीचा प्रचार संपला आणि ओडिशाला चक्रीवादळाने तडाखा दिला. त्याही वेळी सारंगी बचावकार्यासाठी धावले होते. 

निवडणुकीचा प्रचार संपला आणि ओडिशाला चक्रीवादळाने तडाखा दिला. त्याही वेळी सारंगी बचावकार्यासाठी धावले होते. 

६४ वर्षीय सारंगी अविवाहित आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. निवडणुकीमध्ये विजय मिळविल्यानंतर सारंगी यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका छोट्याशा बॅगमध्ये पुस्तकं आणि काही कपडे ते भरत होते.. कारण इतकी वर्षं समाजकार्यात घालवलेला हा माणूस आता दिल्लीला निघाला होता.. खासदार म्हणून! आता याच साध्या माणसानं आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.. लोकशाही लोकशाही म्हणजे अजून काय वेगळं असतं..?

Web Title: Pratap Chandra Sarangi takes oath as a minister in Modi Cabinet

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com