पुलवामा हल्ला ही एक दुर्घटना : दिग्विजयसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 मार्च 2019

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ही एक दुर्घटना असल्याचे सांगितले. दिग्विजयसिंह यांनी याबाबत ट्विट केले. 

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी ही एक दुर्घटना असल्याचे सांगितले. दिग्विजयसिंह यांनी याबाबत ट्विट केले. 

सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारे दिग्विजयसिंह यांच्या या टि्वटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी एकापाठोपाठ एक असे टि्वट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर परदेशी माध्यमांमध्ये शंका घेत आहेत. या वृत्तामुळे भारत सरकारच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 

दरम्यान, यापूर्वी दिग्विजयसिंह यांनी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले, त्याची आकडेवारीही मागितली होती.

Web Title: Pulwama Attack is an accident says Digvijay Singh

संबंधित बातम्या

Saam TV Live