'पर्रीकरांच्या बेडरुममध्ये राफेल गैरव्यवहाराची कागदपत्रे' - रणदीप सुरजेवाला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 जानेवारी 2019

नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये आहेत. याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

मला कोणी काहीही करू शकत नाही. कारण, राफेल गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे वक्तव्य पर्रीकर यांनी बैठकीत केल्याचे समोर आल्यानंतर काँग्रेसने हा आरोप केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींना राफेल गैरव्यवहारावरून लक्ष्य केले आहे.

सुरजेवाला म्हणाले, ''राफेल विमान खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला असून, राफेलबाबत पर्रीकरांकडे मोठी माहिती आहे. मोदीनी देशाला सांगावे की पर्रीकर यांच्या घरात राफेल गैरव्यवहाराशी संबंधित कोणती कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत. देशाचा चौकीदार यावर पडदा टाकत आहे. त्यामुळे गोवा सरकार लटकले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे चौकीदार संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीमुळे का पळत आहेत. याची उत्तरे दिली पाहिजेत. त्यामुळे आम्ही पुन्हा म्हणत आहेत चौकीदार चोर है.''

Web Title: marathi news new delhi rafale deal file in manohar parrikars bedroom randep surjewala 

संबंधित बातम्या

Saam TV Live