विश्वकरंडक स्पर्धेत रविचंद्रन अश्विनची टीम इंडियासाठी मोठी भविष्यवाणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या संघाने २००३ आणि २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ज्याप्रमाणे आपला दबदबा निर्माण केला होता. त्याचप्रमाणे सध्याच्या विश्वकरंडक स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे, असे फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने म्हटले आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवले आहेत.

अश्विन फाऊंडेशनच्या उदघाटनानंतर बोलताना रविचंद्रन अश्विन म्हणाला, सध्या सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारत तसाच दबदबा निर्माण करेल, जसा २००३ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्माण केला होता. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही फिरकीपटूंची जोडी चांगली कामगिरी करीत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

Web Title : Ravichandran Ashwin's big prediction for Team India in World Cup tournament

संबंधित बातम्या

Saam TV Live