एअरस्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा नातेवाईक ठार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये जैशे महंमदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा नातेवाईक ठार झाल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये जैशे महंमदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरचा नातेवाईक ठार झाल्याचे वृत्त आहे.

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची भावना देशभरातून व्यक्त करण्यात येत होती. अखेर भारतीय हवाई दलाने आज (मंगळवार) पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चिकोटी आणि मुझफ्फराबाद येथे हवाई हल्ले केले. तब्बल 1000 किलोचे बॉम्ब टाकून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या मसूद अजहरचा नातेवाईक हा तळ चालवत होता. त्याचा तळ भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. 

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत मसूद अजहरचा मेव्हणा मौलाना युसूफ अजहर उर्फ उस्ताद गौरी याचा खात्मा झाल्याबाबत अधिकृत माहिती नसल्याचे म्हटले होते. पण, याच्यासह सुमारे 300 दहशतवादी मारल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात जैशच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांचाही मृत्यू झाला आहे.

Web Title: Jaish chief Masood Azhars brother-in-law was target of IAF strike in Balakot


संबंधित बातम्या

Saam TV Live