RBI कडून रेपो दरात कपात झाल्यास त्याचा तत्काळ फायदा SBI च्या खातेधारकांना मिळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या खातेधारकांना मिळणार आहे. तसेच रेपो दर वाढल्यास कर्ज आणि ठेवींवरील व्याजदरात देखील वाढ होईल. बँकेचा व्याजदर थेट रेपोदराशी जोडणारी देशातील पहिली बँक ठरणार आहे. हा निर्णय येत्या 1 मेपासून लागू होणार आहे. 

लहान कर्जदार आणि ठेवीधारकांना मात्र यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्यांचा यामध्ये समावेश असणार आहे. शिवाय कमी कालावधी असणारे 'कॅश क्रेडिट' आणि 'ओव्हर ड्राफ्ट'ची मर्यादा देखील एक लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एक लाख रुपयांच्या अधिक रकमेचे 'कॅश क्रेडिट' आणि 'ओव्हर ड्राफ्ट' हे देखील रेपो दराशी जोडले जाणार आहेत. 

सध्या बँकेच्या एकूण ठेवींपैकी 33 टक्के ठेवी या एक लाखांहून अधिक रकमेच्या आहेत, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले.

रेपो दराशी जोडल्याचा काय परिणाम होणार? 
- एक लाखांहून अधिक रकमेच्या ठेवी असेल तर यापुढे व्याजाचादर थेट रेपो दराशी जोडला जाणार. लहान ठेवीदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. 

- बचत खात्यातील एक कोटींहून अधिक रकमेच्या ठेवींवर सध्या 4 टक्के व्याज दिले जाते. ते आता कमी होऊन 3.5 टक्के होईल. 

- प्रभावी व्याजदर रेपो रेटपेक्षा 2.25 टक्के जास्त असणार आहे. सध्या रेपोदर 6.25 टक्के आहे. त्यामुळे आता प्रभावी व्याजदर 8.5 टक्के असणार आहे. रेपो दर कमी अथवा जास्त झाल्यानंतर यात बदल होणार आहे. 

Web Title: SBI links pricing of loans,deposits to repo rate

संबंधित बातम्या

Saam TV Live