शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निश्चित 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली :लोकसभा 2019 लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित आहे. मोठ्या अनिश्चिततेनंतर अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

ठाण्यातून गणेश नाईक, बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधून धनंजय महाडीक, मावळमधून पार्थ पवार, भंडारा गोंदियामधून प्रफुल्ल पटेल, नाशिकमधून छगन भुजबळ, बीडमधून अमरसिंह पंडित, उस्मानाबादमधून अर्चना पाटील, शिरूरमधून दिलीपवळसे पाटील, औरंगाबादमधून सतिष चव्हाण अशी जवळपास यादी निश्चीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, अशी भूमिका अनेक दिवसांपासून शरद पवार मांडत होते. पण माढा मतदारसंघात राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांमधील संघर्षानंतर शरद पवार यांच्या उमेदवारीची मागणी करण्यात आली. त्यानंतर आता शरद पवारच माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे आता निश्चित झालं आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीला शेतकरी कामगार पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावर मोठी चर्चा सुरु झाली होती. माढातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील शरद पवार यांनी येथून निवडणू्क लढावी अशी मागणी केली होती.

Web Title:  Sharad Pawar is sure to be the NCP candidate

संबंधित बातम्या

Saam TV Live