मसूद अझहरच्या सुटकेवरून काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेवरून काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मनमोहनसिंगही उपस्थित होते.

अमित शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गोष्टींची आठवण करुन दिली. यामध्ये विमान अपहरणाच्या घटनेनंतर वाजपेयी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग या दोन्ही नेत्यांनी उपस्थिती लावली होती. सर्वपक्षांनी मिळून मसूद अझहरची सुटका करावी आणि प्रवाशांना परत आणावे, असा निर्णय देशाच्या भावनेचा विचार करुन घेण्यात आला. त्यावेळी हा निर्णय घेण्याशिवाय आणखी दुसरा कोणताही पर्यायही नव्हता, असे शहा यांनी सांगितले.

दरम्यान, ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची होती. मसूद अझहरची सुटका का केली? असा प्रश्न राहुल गांधी यांच्याकडून केला जात आहे. त्यावरून राहुल गांधी देशाची दिशाभूल करत आहेत, असेही अमित शहा यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. 

Web Title: Sonia Gandhi was idea of release of Terrorist Azhar says Amit Shah

संबंधित बातम्या

Saam TV Live