Loksabha 2019 : 'चौकीदार चोर है' वर बोलणाऱ्या राहुल गांधींनी स्पष्टीकरण द्यावे- सर्वोच्च न्यायालय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 एप्रिल 2019

नवी दिल्ली: राफेल व्यवहारामध्ये 'चौकीदार चोर है' असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळे राहुल गांधींनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च संबंध जोडल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या 23 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

'चौकीदार चोर है', हे वक्तव्य न्यायालयाशी जोडल्याने राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना ही नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी राफेल व्यवहार प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा झटका देत, पुन्हा सुनावणी होणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी, राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, न्यायालयानेही चौकीदार चोर है असे सांगितले आहे.

Web Title: Supreme Court Asks Rahul Gandhi To Explain Rafale Remark

संबंधित बातम्या

Saam TV Live