राफेलप्रकरणी नव्याने सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 एप्रिल 2019

नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला राफेल करार प्रकरणी मोठा धक्का दिला आहे. या कराराप्रकरणी पुराव्यांच्या कागदपत्रांवरील आक्षेप न्यायालयाने फेटाळला असून, न्यायालयाने सादर केलेली कागदपत्रे वैध ठरविली आहेत.

राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तपशीलात जाण्याची गरज नव्हती, असे म्हटले होते. मात्र, आता या निर्णयामुळे सरकारला झटका बसला आहे. पंतप्रधान कार्यालय या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवत आहे. पंतप्रधान कार्यालयाने कागदपत्रे गहाळ झाल्याचे म्हटले होते. देशभरातून टीका झाल्यानंतर फोटोकॉपी गहाळ झाल्याचे म्हणत सारवासारव केली होती. राफेल प्रकरणी हिंदू वृत्तपत्राने चालविलेल्या मालिकेतील कागदपत्रांच्या आधारे प्रशांत भूषण, अरुण शौरी, यशवंत सिन्हा यांच्यासह अन्य काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

फ्रान्ससोबत करण्यात आलेल्या राफेल कराराच्या निकालाची फेरतपासणी करण्यासाठी ज्या दस्तऐवजावर विशेषाधिकारी असे नमूद केले आहे त्यावर अवलंबून राहता येणं शक्य होणार नाही अशी प्राथमिक हरकत केंद्र सरकारने घेतली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तीन कागदपत्रे ग्राह्य धरली जाऊ शकतात, असे सांगितले आहे. 

Web Title: Supreme Court has allowed admissibility of three documents in Rafale deal

संबंधित बातम्या

Saam TV Live