'2016 पूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे आपल्याकडे नाहीत'- संरक्षण मंत्रालय

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मे 2019

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने 2016 पूर्वी केलेल्या कोणत्याही सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे अथवा माहिती आपल्याकडे नाही, असे संरक्षण मंत्रालयाने आज स्पष्ट केले. जम्मूमधील एका व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या माहितीवर मंत्रालयाने हे उत्तर दिले. 

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) कार्यकाळात सहा सर्जिकल स्ट्राइक केले गेले, मात्र मतांसाठी त्याचा वापर केला नव्हता, असा दावा कॉंग्रेसने केला. संरक्षण मंत्रालयाचे आजचे स्पष्टीकरण हे कॉंग्रेसच्या या दाव्याला खोडून काढणारे आहे. निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात सर्जिकल स्ट्राइकवरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये शब्दयुद्ध सुरू असतानाच संरक्षण मंत्रालयाने सादर केलेले उत्तर एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. या उत्तरानुसार, उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने 29 सप्टेंबर 2016 ला केलेल्या सर्जिकल स्ट्राइकव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्ट्राइकबाबत संरक्षण मंत्रालयाकडे माहिती नाही.

जम्मूमधील कार्यकर्ते रोहित चौधरी यांनी 2004 ते 2014 या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारणा केली होती. नंतर एका वाहिनीवर बोलताना चौधरी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या उत्तराच्या आधारे कॉंग्रेसवर खोटेपणाचा आरोप केला. 

Web Title: There is no proof of strike during UPA says Defense Ministry

संबंधित बातम्या

Saam TV Live