कोण आहेत 'विंग कमांडर अभिनंदन',

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केल्याची माहिती व व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर ट्विटरवर काही वेळातच अभिनंदन हे टॉप टेनमध्ये आले.

नवी दिल्लीः पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केल्याची माहिती व व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर ट्विटरवर काही वेळातच अभिनंदन हे टॉप टेनमध्ये आले.

अभिनंदन यांच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी नेटिझन्स सोशल मीडियाचा वापर करत आहेत. अभिनंदन यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाकिस्तानने पकडल्यानंतर तेथील नागरिक त्यांना मारून टाका म्हणून सांगत असल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. शिवाय, पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डोळे व हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आहेत. 'माझे नाव विंग कमांडर अभिनंदन. माझा सर्व्हिस क्रमांक 27981. मी हवाई दलाचा वैमानिक असून, माझा धर्म हिंदू आहे,' असे या व्हिडिओमधून दाखवले जात आहे. शिवाय, त्यांच्याकडून माहिती वदवून घेतले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

अभिनंदन यांचा 16 मे 2011 मधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये वैमानिक एकत्र बसलेले असून, त्यांची ओळख सांगितली जात आहे. अभिनंदन यांचे वडील हे माजी एअर मार्शल आहेत. दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी लष्कराने पकडल्यानंतर सैनिकांसह नागरिक मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title: Who is Wing Commander Abhinandan Varthaman?


संबंधित बातम्या

Saam TV Live