संन्यासी व्यक्तीला आतापर्यंत भारतरत्न का नाही ? - रामदेवबाबा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 जानेवारी 2019

नवी दिल्ली : आपल्या देशात आतापर्यंत एकही संन्यासी व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही. या देशात हिंदू असणे गुन्हा आहे का, असा प्रश्न योगगुरु रामदेवबाबा यांनी उपस्थित केला आहे.

रामदेवबाबा यांनी नुकतेच दोन मुले असलेल्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न घेऊ देण्याची मागणी केली होती. तसेच त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचेही म्हटले आहे. भाजपचा प्रचार करणार नसल्याचेही रामदेवबाबांनी यापूर्वी स्पष्ट केलेले आहे. आता भारतरत्न पुरस्कारावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

रामदेवबाबा म्हणाले, की महर्षी दयानंद किंवा स्वामी विवेकानंद यांचे देशाच्या जडणघडणीत एखाद्या राजकारणी किंवा कलाकारापेक्षा कमी आहे का? आतापर्यंत एकही संन्यासी व्यक्तीला भारतरत्न मिळालेला नाही. मदर तेरेसा या ईसाई असल्याने त्यांना भारतरत्न देण्यात आला. पण, संन्यासी व्यक्तीला हिंदू असणे आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला नाही. या देशात हिंदू असणे गुन्हा आहे का?

Web Title:  Why does saints get no Bharat Ratna so far? - Ramdev Baba

संबंधित बातम्या

Saam TV Live