दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवतील ?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता याबाबत स्वत: रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्ह वापरू नये, असेही बजावले आहे.

मागील वर्षी रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढत राजकारणात प्रवेश केला. या पक्षस्थापनेनंतर रजनीकांत आगामी लोकसभा निवडणूक लढवतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आपला पक्ष किंवा मी स्वत: लोकसभेची निवडणूक लढविणार नाही. याशिवाय आमचा पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याने राजकीय पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणीही वापरू नये, असेही सांगितले. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, रजनीकांत यांनी हे स्पष्टीकरण दिल्याने सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

Web Title: Will not be contesting in the Lok Sabha says Rajinikanth

संबंधित बातम्या

Saam TV Live