वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जून 2019

नवी दिल्ली : अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळ गुरुवारी दुपारी गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अत्यंत तीव्र अशा या चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये किनारपट्टीच्या भागात विशेष काळजी घेण्यात आली आहे. सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती गुजरातमधील राज्य प्रशासनाने दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत वायूपासून लोकांचा बचाव करण्यासाठी आणि संभाव्य हानीवर तातडीने उपाय योजण्यासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा कऱण्यात आली. 

राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, सर्व पालकमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पर्यटकांनीही किनारपट्टीच्या भागात थांबू नये. त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title :  wind cyclone today will hit the coast of Gujarat, alert to citizens

संबंधित बातम्या

Saam TV Live