सुरक्षा दलांविरोधात दहशतवादी हल्ला केल्याशिवाय हिजबुलमध्ये प्रवेश नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जून 2019

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटने हिजबुल मुजाहिद्दीनचं कंबरडे मोडलंय. ऑपरेशन ऑलआऊटमध्ये लष्कराने हिजबुलच्या अनेक टॉप कमांडरांचा खात्मा केला. लष्कराच्या कारवाईचा धसका घेतलेल्या हिजबुलने आता नवीन चाल खेळू लागलाय. सुत्रांच्या माहितीनुसार यापुढे कोणालाही डायरेक्ट दहशतवादी संघटनेत प्रवेश दिला जाणार नाही. 

सुरक्षा दलांविरोधात दहशतवादी हल्लाकरुन स्वत:ला सिद्ध केल्यानंतरच दहशतवादी संघटनेत सहभागी केलं जाणार आहे. हिजबुल मुजाहिद्दीनने आपल्या भरतीत बदल करण्यामागे मोठं कारण म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षात ऑपरेशन ऑलआऊटमध्ये लष्कराने केलेला दहशतवाद्यांचा खात्मा. गुप्तचर संघटनांनी काश्मीरी तरुणांमध्ये आपली पाळमुळं रोवलीत. हे तरुण दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्यानंतर दहशतवाद्यांची माहिती सुरक्षादलांना देतात. याच माहितीच्या आधारे भारतीय, लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा केला जातो 

हिजबुल मुजाहिद्दीनच्या नव्या अटीमुळेच यावर्षी दहशतवादी संघटनेत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या कमी झालीय. आतपर्यंत फक्त 50 तरुण हिजबुल किंवा जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झालेत. तर मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 114 पोहचलाय. भारतीनं लष्करानं केलेल्या धडक कारवाईमुळं हिजबुल मुजाहिदीनचं कंबंरड मोडलंय.

हिजबुल मुजाहिदीनं काश्मीरमख्ये आपली पाळमुळं पसरवण्याचा प्रयत्न करत असली तरी त्याचा बिमोड भारतीय लष्कराचे जवान केल्याशिवाय राहणार नाहीत.

WebTitle : marathi news new modus operandi of hizbul mujahideen against India 

संबंधित बातम्या

Saam TV Live