नीरव मोदींचा अलिबागमधील बंगला डायनामाइटने उद्ध्वस्त करण्यात येणार
नवी मुंबई - पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी नीरव मोदीचा अलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगत ३० हजार चौरस फुटांवरील अलिशान बंगला आहे. हा बंगाल शुक्रवारी सकाळी डायनामाइटने उद्ध्वस्त करण्यात येणार आहे. हा बंगला जमीनदोस्त करण्याची तयारी रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
हा बंगला पाडण्याचे काम सुरु झाले असून, बंगल्यातील टाइल्स आणि प्लास्टर मंगळवारी उखडून कढण्यात आले.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 'डिमॉलिशन मॅन' अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांच्याकडे बंगला पाडण्याची जबाबदारी सोपवली आहे. शितोळे यांनी 2000 आणि 2001मध्ये भाईंदरमधील 40 अनधिकृत इमारती स्फोटकांनी उद्ध्वस्त केल्या होत्या.
'सध्याच्या बाजारभावानुसार नीरव मोदीच्या या अलिशान बंगल्याची किंमत २५ कोटी रुपये आहे.
Web Title: Nirav Modi's Alibaug bungalow to be dynamited on Friday