सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत नवा ट्विस्ट, चावीवाल्याने केला धक्कादायक गौप्यस्फोट

साम टीव्ही
रविवार, 23 ऑगस्ट 2020

 

  • सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत नवा ट्विस्ट
  • 'आतून आवाज आला तर काम थांबव'
  • चावीवाल्याने केला धक्कादायक गौप्यस्फोट

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत एक नवा ट्विस्ट आलाय. 14 जूनला सिद्धार्थ पिठानीनं एका चावीवाल्याला सुशांतच्या घरी बोलावलं होतं. या चावीवाल्यानं एक धक्कादायक खुलासा केलाय. ज्यामुळे या प्रकरणातील आणखी काही कंगोरे समोर येतील. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर तपासाला वेग आलाय. यामध्येच सुशांतच्या घरी 14 जून रोजी एका चावीवाल्याला बोलविण्यात आलं होतं ही नवीन माहिती समोर आलीय. याप्रकरणी चावीवाल्याने केलेल्या वक्तव्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका माहितीनुसार 14 जून रोजी सिद्धार्थ पिठानीनं  एका चावीवाल्याला सुशांतच्या घरी बोलावलं होतं. दरवाज्या उघडण्यासाठी सिद्धार्थनं चावीवाल्याला चक्क 2 हजार रुपये दिले होते आणि काम झालं की लगेच निघायचं असंही सांगण्यात आलंय. 
 

हा चावीवाला सांगतो...

मला 14 जून रोजी दुपारी 1 वाजून 5 मिनीटांनी सिद्धार्थ पिठानीचा फोन आला होता. त्यावेळी मी त्यांना व्हॉट्स ऍपवर कुलूपाचा फोटो पाठविण्यास सांगितलं. फोटो पाहिल्यानंतर मी सुशांतच्या घरी सहाव्या मजल्यावर पोहोचलो आणि कुलूप उघडण्यास सुरुवात केली. पण ते सुशांतचं घर आहे हे मला माहित नव्हतं. मी काम करत असतानाच दरवाजा तोडून टाक असं मला सांगण्यात आलं. तसंच आतून जर कोणता आवाज आला तर काम लगेच थांबव असंही मला सांगण्यात आलं होतं, सुशांतच्या दरवाजाचं लॉक हे कम्प्युटराइज होतं. त्यामुळे हातोडीच्या सहाय्यानं ते तोडावं लागलं. त्यानंतर मला या कामाचे 2 हजार रुपये देण्यात आले आणि लगेच जायला सांगितलं. मात्र मला घरात जाण्यास मनाई करण्यात आली. 

सीबीआयनं सूत्र हाती घेतल्यानंतर सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. आता या चावीवाल्याला माहितीतून या प्रकरणातील इतर धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? याचं उत्तर लवकरत मिळणं अपेक्षित आहेत. 


संबंधित बातम्या

Saam TV Live