आज पुन्हा देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ... वाचा कुठे, किती रुग्ण वाढले...?

साम टीव्ही
मंगळवार, 9 जून 2020

आणि असं असताना मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून काल एक 80 वर्षीय आजोबा बेपत्ता झाले. त्यांचा मृतदेह आज सकाळी बोरिवली स्टेशनवर सापडलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. हे 80 वर्षीय आजोबा काल पहाटेपासून बेपत्ता होते. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्यांचा नातेवाईंकांनी आरोप केलाय

आज पुन्हा देशभरातील कोरोनाग्रस्तांमध्ये जवळपास 10 हजार रुग्णांची भर पडलीय... देशातील वाढलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर एक नजर टाकुयात 

सलग 10 व्या दिवशी देशात 9 हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. देशात मागील 24 तासांत तब्बल 9 हजार 987 रुग्ण आढळले असून 331 जणांचा मृत्यू झालाय. आज घडीला देशाची रुग्णसंख्या 5 लाख 98 हजार 611वर पोहोचलीये. त्यापैकी 1 लाख 29 हजार 917 एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1 लाख 29 हजार 155 रुग्णं बरे झालेत. आतापर्यंत देशात 7 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या 10 दिवसांमध्ये देशातील रुग्णवाढीचा वेग कमालीचा वाढला असल्याचं या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. तसंच मृतांची संख्याही वाढत असल्याचं अधोरेखित झालंय. 

त्यातच, मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढतच चाललीये. कोरोनामुळे काल मुंबईत ६४ रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. तर १ हजार ३१४ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ८५ इतकी झालीय. मुंबईत काल ६४ रुग्ण दगावल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या १ हजार ७०० झाली आहे.याशिवाय काल १ हजार ३१४ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतली एकूण रुग्णसंख्या 50 हजाराच्या पार गेलीये. आतापर्य़ंत मुंबईत २२ हजार ३८ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलीये. तर तिकडे चर्चगेट परिसरात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या यशोधन या इमारतीत तब्बल २६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. त्यामुळे मुंबईच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. आत्तापर्यंत प्रधान सचिव दर्जाचे ४ अधिकारी आणि ८ आयपीएस अधिका-यांना कोरोनाची लागण झालीये. या इमारतीतील चाचणी केलेल्या एकूण ९० जणांपैकी २६ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आलीय.

आणि असं असताना मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून काल एक 80 वर्षीय आजोबा बेपत्ता झाले. त्यांचा मृतदेह आज सकाळी बोरिवली स्टेशनवर सापडलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. हे 80 वर्षीय आजोबा काल पहाटेपासून बेपत्ता होते. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्यांचा नातेवाईंकांनी आरोप केलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live