गोपीनाथ 'गड' ओबीसींचा कसा? पाहा...

माधव सावरगावे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

गेल्या 25 वर्षांपासून 'माधवम'च्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून राज्यातील बहुजन समाज एकवटला. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे हा समाज आता भाजपपासून दूर जाईल का अशी चर्चा सुरु झालीय. भगवान गड ते गोपीनाथ गड हा राजकीय प्रवास कसा राहिला पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

गेल्या 25 वर्षांपासून 'माधवम'च्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून राज्यातील बहुजन समाज एकवटला. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे हा समाज आता भाजपपासून दूर जाईल का अशी चर्चा सुरु झालीय. भगवान गड ते गोपीनाथ गड हा राजकीय प्रवास कसा राहिला पाहुयात हे सविस्तर विश्लेषण...

बीड म्हणजे जणू राजकीयदृष्ट्या सतत घडणाऱ्या घटनांचे माहेरघर. १९९३ पासून अनेक स्थित्यंतरे आली. अनेक नेते उभे राहिले, अनेक आघाड्या तयार झाल्या. फुटल्या. नेते सोयीनुसार आपापले पक्ष बदलले. मात्र, राजकीय वातावरण मात्र, कधी शांत झालचं नाही. हे सगळ घडायचं ते गडावरून. गेल्या २५ वर्षांपासून बीडचं राजकारण कायमच या गडांभोवती फिरत आलंय. अगोदर २० वर्ष भगवानगड आणि गेल्या पाच वर्षांपासून गोपीनाथ गडाकडे हा राजकीय वारसा आलाय. 

वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवान गड अवघ्या महाराष्ट्राला माहिती झाला. मुंडेंची या गडावर प्रचंड श्रध्दा होती. 1993 साली ते प्रथम गडावर आले. 1996 नंतर भगवान गड, दसरा व मुंडेंचं भाषण हे समीकरण बनलं. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर या गडावर राजकीय कार्यक्रमाला गडाचे विश्वस्त नामदेव शास्त्रींनी मनाई केली. त्यामुळे पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालूक्यातील संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगावात दसरा मेळावा घ्यायला सुरूवात केली. आणि परळीत गोपीनाथ गडाची स्थापना केली. 
गोपीनाथ मुंडे राजकीयदृष्ट्या ऐन भरात असताना त्यांनी माधवं पॅटर्न राबवत राज्यातल्या ओबीसींना त्यातही विशेष करून माळी, धनगर, वंजारी या समाजाला भाजपच्या पाठिशी उभं केलं. तोच माधवंचा प्रयोग त्यांची लेक पुन्हा 25 वर्षांनंतर गोपीनाथ गडावरून करतेय. गुरूवारी गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी इथे पंकजा मुंडेंकडून भूमिका जी घेतली जाईल, त्यावर माधवं फॅक्टर भाजपच्या पाठिशी राहणार की दूर जाणार याचा फैसला होईल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live