पैसे लुटण्यासाठी होम आयसोलेशन पॅकेज? वाचा कॉर्पोरेट हॉस्पिटलचा नवा फंडा

साम टीव्ही
सोमवार, 20 जुलै 2020
 • पुण्यात कॉर्पोरेट हॉस्पिटलचा नवा फंडा
 • होम आयसोलेशन पॅकेज जोमात
 • आर्थिक लुटीसाठी होम आयसोलेशन पॅकेज ?

सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांना राज्य सरकारनं घरातच विलगीकरण-उपचाराची परवानगी दिलीय. त्याच धर्तीवर पुण्यात सध्या होम आयसोलेशन पॅकेजची चलती आहे. काही नामांकित रुग्णालयांनी यात उडी घेत उखळ पांढरं करण्याचा सपाटा लावलाय.

होम क्वारंटाईन स्वीकारणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसाठी आता कॉर्पोरेट हॉस्पिटल्स सरसावलीयेत. अशा रुग्णांसाठी होम आयसोलेशन पॅकेज या हॉस्पिटल्सनी तयार केलीयेत. काही कॉर्पॉरेट हॉस्पिटल्सनी मात्र ही नामी संधी साधून प्रीमिअम पॅकेजच्या नावाखाली लूट सुरु केलीय. 

 

 • गृह विलगीकरणाचा पर्याय निवडलेल्या कोरोना रुग्णांसाठी 17 दिवसांसाठी ही पॅकेज आहेत
 • या पॅकेजचे दर 7 ते 23 हजारांपर्यंत आहेत
 • ताप पाहण्यासाठी डिजिटल थर्मामीटर रुग्णालयाकडून पुरवला जातो
 • ऑक्सिजन पाहण्यासाठी पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर दिला जातो
 • संसर्ग होऊ नये म्हणून मास्क आणि हातमोजेही दिले जातात
 • साफसफाईच्या पाण्यात टाकण्यासाठी जंतुनाशक गोळ्या पुरवल्या जातात
 • केअर टेकरसाठी प्रतिंबधात्मक हायड्रोक्सि-क्लोरी-क्विन गोळ्या पुरवल्या जातात
 • दररोज डॉक्टरांकडून फोन किंवा व्हॉट्सअपद्वारे तब्येतीचा आढावा घेतला जातो
 • श्वास घेण्यास त्रास किंवा लक्षणं वाढली तर रुग्णालयाच्या फ्लू ओपीडीमध्ये उपचारांची सुविधा दिली जाते
 • सतराव्या दिवशी तपासणी करुन डिस्चार्ज कार्ड दिलं जातं
 • विशेष म्हणजे रुग्णांकडूनही या पॅकेजला भरभरुन प्रतिसाद मिळतोय.

गृह विलगीकरणात रुग्णानं उपचार घेतल्यानं हॉस्पिटल्सवरचा बोजा कमी होतोय हे नक्की पण होम आयसोलेशन पॅकेजचे चढे दर पाहता या माध्यमातूनही लूट होत असल्याची तक्रार रुग्ण खासगीत करताना दिसतायंत. यासंबंधी राज्य सरकारनं दरपत्रक निश्चित करणं आवश्यक आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live