मुंबई, पुणेकर अतिशहाणे! मात्र तुमची बेफिकीरी जीव घेईल

साम टीव्ही
सोमवार, 14 सप्टेंबर 2020
 • सावधान! तुमची बेफिकीरी जीव घेईल
 • राज्यात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली
 • मुंबई, पुणेकर अतिशहाणे

राज्यात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढू लागलाय. संपुर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत असतानाही संसर्गाचं प्रमाण का वाढू लागलंय? पाहूयात एक रिपोर्ट..

राज्यभरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आता नागरिकही बेफिकीरीने वागू लागलेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरणं बंधनकारक असतानाही अनेक नागरिक विना मास्क फिरू लागल्याने धोका वाढलाय. अशा नागरिकांवर आता कठोर कारवाईला सुरूवात झालीय. 

 • मास्क न वापरल्याबद्दल मुंबईत गेल्या पाच महिन्यात 27 लाख 48 हजार 700 रुपयांची दंडवसुली झालीय. 
 • तर पुण्यात फक्त 9 दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्यांकडून दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.
 • औरंगाबादमध्येही मास्कविना फिरणाऱ्या कडून 18 लाख 87 हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय. 
 • नाशिकमध्येही 19 हजार 225 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आलीय. 
 • तर नागपुरातून 7 लाख 92 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केलाय.
 • मास्कचा वापर केल्यास कोरोनाचा धोका 90 टक्क्यांनी घटत असल्याचा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलाय. अजूनही कोरोनाचा धोका पुरता टळलेला नाही, त्यामुळे मास्क न वापरण्याची तुमची बेपर्वाई तुमच्यासह तुमच्या आप्तांचा जीवही धोक्यात आणतेय, हे लक्षात ठेवा. 
   


संबंधित बातम्या

Saam TV Live