खासगी शाळांनी बक्कळ फीसाठी लढवली ही शक्कल

साम टीव्ही
सोमवार, 15 जून 2020
 • ज्ञान देणाऱ्या शाळा बनल्या फायनान्स कंपन्यांच्या पुरवठादार
 • शाळेची फी भरण्यासाठी फायनान्स कंपन्या सरसावल्या
 • शाळाच नेमून देतायंत फायनान्स कंपन्या

खासगी शाळांनी आपल्या प्रवेश प्रक्रिया सुरु केल्यात. अशात लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या शाळेची फीस कशी भरायची याची चिंता लागलीय. त्यावर आता खाजगी शाळांनी पालकांसाठी फायनान्सर शोधलेत. 

राज्यातील खाजगी शाळांनी आपली प्रवेश प्रक्रिया सुरु केलीय. त्या शाळांची असलेली भरमसाठ फस कशी भरायची याची चिंता पालकांना लागलीय. अशात मुलांचं शुल्क कसं भरायचे याची चिंता असलेल्या पालकांना शाळांनीच नवीन आयडिया सुचवलीय. खासगी फायनान्सरशी संधान साधत पालकांना कर्ज देण्याची सुविधा शाळांनी देऊ केलीय.

खासगी शाळांची लुटण्याची नवी क्लृप्ती 

 • अनेक शाळांनी स्वतःच्या नेटवर्कमधले फायनान्सर शोधलेत.
 • त्यातून अमुक फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्या, आमची पूर्ण फी भरा आणि टप्प्याटप्प्याने हफ्ते फेडा अशी योजना आहे. 
   
 • काही शैक्षणिक संस्थांनी शून्य टक्के तर काही शाळांनी अल्प व्याजदरावर कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीची सोय केलीय.
 • प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील मोठ्या इंग्रजी शाळेत ५० हजारापासून ते जवळपास १ लाख फी आहे.
 • फायनान्स कंपनीकडून शाळांकडून एकरक्कमी उचल घेतली जाईल आणि त्यानंतर पालकांनी फायनान्स कंपनीचे हप्ते भरत राहायचे. 
 • त्यात दर महिन्याला ५ हजार ते १० हजाराचा हप्ता असेल.
 • तिमाही योजनाही करता येईल, त्यासाठी १८ हजार ते २६ हजार इतकी रक्कम तीन महिन्याला एकदा भरावी लागणार आहे.
 • त्यामुळे आपल्या मुलांचा प्रवेश रद्द झाला तर कुठे प्रवेश घ्यायचा या चिंतेत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. आता जर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही, त्यासाठी अनेक पालक वेटिंगवर असल्याच्या धमक्या शाळेकडून दिल्या जातायत. आर्थिक अडचणी सांगणाऱ्या पालकांसमोर फायनान्सरचा पर्याय देऊन पालकांना संकटात टाकत असल्याचं दिसून येतंय. मात्र, कोणताही पालक पुढ येऊन सांगण्याची हिंमत करीत नाही. कारण त्यांना आपल्या मुलांची चिंता आहे. त्याचाच गैरफायदा अनेक शाळा घेतायंत, त्यामुळे या शाळांवर कोण आणि कशी कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे.
  दरम्यान, राज्यात आजपासून शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत. झूम ऍपच्या माधमातून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवताहेत..काही शिक्षकांनी अभ्यासक्रमाचे व्हिडीओ तयार केलेत...आणि ते विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर पाठवले आहेत...ज्याद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत...काही ठिकाणी शिक्षक शाळेत येत आहे, आणि विद्यार्थी घरी बसून व्हर्च्युअल शिक्षण घेताहेत..कोरोनाच्या संकटामुळं पहिल्यांदाच शिक्षण व्यवस्थेत हा अमुलाग्र बदल झालेला पाहायला मिळतोय...


संबंधित बातम्या

Saam TV Live