मराठी वृत्तवाहिनीच्या निवेकदाला बंदूकीचा धाक दाखवून लुटलं

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

मराठी वृत्त वाहिनीच्या निवेदकाला लुटारुंनी धाक बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गिरीश निकम असं या पत्रकाराचे नाव असून तो खारघर सेक्टर-12 मध्ये राहण्यास आहे. एका खासगी कारमधून गिरीश पुण्याहून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. यावेळी चालकाच्या शेजारी बसलेला व्यक्ती गिरीशच्या बाजुला बसल्यानंतर त्याने गिरीशच्या कमरेला बंदूक लावून त्याला मारहाण केली.

त्यानंतर त्याच्याजवळ जे काही आहे, ते काढून देण्यास बळजबरी केली. अन्यथा त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असलेले पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर लुटारुंनी गिरीशजवळ असलेले एटीएम कार्ड जबरदस्तीने काढून घेऊन त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला ठार मारण्याची धमकी देऊन एटीएम कार्डचा पासवर्ड विचारुन घेतला. त्यानंतर लुटारु चौघांनी काही किलोमीटर अंतरावर कार थांबवून गिरीशच्या एटीएम कार्डचा वापर करुन त्याच्या खात्यातील 41 हजाराची रोख रक्कम काढुन घेतली.

लुटारुंनी या पत्रकाराच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला कळंबोलीतील रोडपाली भागात सोडून चौघे फरार झालेत. 

WebTitle : marathi news news anchor looted on mumbai pune highway 

संबंधित बातम्या

Saam TV Live