पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच; मुखपत्रातून शिवसेनेनं मांडली भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

सत्तेत शिवसेनेने भाजपशी युती केली असली, तरी ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे आणि याच निर्धाराने उद्याची विधानसभा भगवी करून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच विराजमान होईल, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात म्हटले आहे. शिवसेनेचा बुधवारी ५३वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त लिहिलेल्या अग्रलेखात पुन्हा एकदा शिवसेनेने युतीत असलो, तरी आमचा बाणा स्वतंत्रच असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता सगळ्यांनाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना युतीने लढणार असल्याचे लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही पक्ष समसमान जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. पण निवडणुकीच्या निकालांनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाचे काय, या संदर्भात अधिकृतपणे काहीच सांगण्यात आलेले नाही. एकीकडे मुख्यमंत्रीपद कायमस्वरुपी भाजपकडे राहावे, यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनाही या पदासाठी आग्रही आहे, हेच आजच्या अग्रलेखामधून दिसून आले आहे.

web title: The next chief minister of Shivsena

संबंधित बातम्या

Saam TV Live