'द्राक्ष गिळून सुरु आहे ट्रेनिंग', काही हजारांसाठी लाख मोलाचा जिव पोटात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 1 मार्च 2020

मुंबई : अमली पदार्थाच्या तस्करीतून गब्बर झालेले नायजेरीयन आता स्वत:चा जिव धोक्‍यात घालत नसून लॅटिन अमेरीकेतील गरीबांना हेरुन त्यांचा वापर करत आहे. या दक्षिण अमेरिकेतील गरीबीमुळे अवघ्या काही हजारांसाठी हजारो किलोमिटरचा प्रवास हे स्वत:चा जिव धोक्‍यात घालून तस्कर करत आहेत. त्याच बरोबरच पुर्वीचा लॅण्डिंग पाईंट गोवा बदलून मुंबई झालाय. 

मुंबई : अमली पदार्थाच्या तस्करीतून गब्बर झालेले नायजेरीयन आता स्वत:चा जिव धोक्‍यात घालत नसून लॅटिन अमेरीकेतील गरीबांना हेरुन त्यांचा वापर करत आहे. या दक्षिण अमेरिकेतील गरीबीमुळे अवघ्या काही हजारांसाठी हजारो किलोमिटरचा प्रवास हे स्वत:चा जिव धोक्‍यात घालून तस्कर करत आहेत. त्याच बरोबरच पुर्वीचा लॅण्डिंग पाईंट गोवा बदलून मुंबई झालाय. 

नायजेरियातील तस्करांनी आता आशियात होणाऱ्या तस्करीतून अमाप संपत्ती कमावली आहे. नायजेरियन चेहरे पट्टीच्या आणि दक्षिण अफ्रिकेतील गरीब देशातून आलेल्या नागरीकांच्या हालचालीवर भारतीय विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यामुळे तस्करी दरम्यान ते पकडले जाण्याची शक्‍यता असल्याने स्वत: तस्करी न करता आशियायी लोकांच्या चेहरेपट्टीशी साधर्म्य असलेल्या लॅटीन अमेरीकेतील गरजू लोकांचा वापर करण्यास सुरवात केली आहे. गेल्या 15 दिवसात लॅटीन अमेरीकेतील तीन नागरीकांना तस्करी करताना मुंबई विमानतळावर पकडण्यात आले आहे. 

लॅटिन अमेरीकेतील अनेक देशामध्ये प्रचंड गरीबी आहे. त्यामुळे 36 हजार पासून 1 लाखा पर्यंत पैशांसाठी हे नागरीक तस्करीसाठी तयार होतात. यात प्रामुख्याने अमली पदार्थ भरलेले कॅप्सूल पोटातून आणायचे असतात. एक जरी कॅप्सुल फुटल्यास त्यांचाही जिवही जाऊ शकतो. पण, तरीही अवघ्या काही हजारांसाठी हे नागरीक आपला जिव धोक्‍यात घालतात त्यावरुन या देशातील गरीबीचा अंदाज येऊ शकतो. 

36 हजारांसाठी 56 कॅप्सुलसह प्रवास 

ब्राझिलचा नागरीक असलेल्या अलेक्‍झॅन्डर डिसोझा (43) याने पोटातून कोकन भरलेल्या 56 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा या 56 कॅप्सुल मध्ये तब्बल 600 ग्रॅम म्हणजे 1 कोटी 83 लाखाचे कोकेन पकडण्यात आले. तर,ब्राझील मधूनच आलेल्या लुईस फर्नांडो डिसिल्वा या 23 वर्षाच्या तरुणाने पोटातून तब्बल 80 कॅप्सुल वाहून आणल्या होत्या. यात 790 ग्रॅम म्हणजे 2 कोटी 38 लाखाचे कोकेन होते. यासाठी त्याला 1 हजार अमेरिकन डॉलर सुमारे 70 हजार रुपये मिळणार होते. तर, करोल लिसेट बोलीवर बेजारानो या 30 वर्षिय लॅटिन अमेरीकन महिलेलाही तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.तीच्या पोटातील 72 कॅप्सुल मध्ये 715 ग्रॅमचे कोकेन होते. या कोकनेची किंमत बाजारा भावानुसार दोन कोटी 14 लाख रुपये होती. 

साओ पावलो आणि अदिस अबाब 
डिसोझा आणि डिसिल्वा या दोन तस्करांना ब्राजील मधील साओ पावलो या शहरातील एका व्यक्तीने हे कोकेन दिले होते. हे दोघेही टूरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. तसेच, हे तीन्ही तस्कर दक्षिण अफ्रिकेतील इथोपिया येथील अदिस अबाबा या शहरातील विमानतळावरुन मुंबईत आले होते. 

द्राक्ष गिळण्याचा आणि पाण्यावर राहाण्याचा सराव 

या तस्करांना द्राक्ष गिळण्याचा सराव करावा लागतो. जेणेकरुन पाणी न पिता ते अख्खी कॅप्सुल गिळू शकतात. त्याचबरोबर ही कॅप्सुल गिळल्यानंतर संपुर्ण प्रवासात त्यांना काही खाता येत नाही. तसेच, पाणी ही हळू हळू प्यावे लागते. त्यामुळे फक्त पाण्यावर राहाण्याचा सरावही त्यांना करावा लागतो.  इथोपिया ते मुंबई पर्यंतचा प्रवास किमान आठ तासांचा आहे. विमानळावर जाऊन बाहेर येई पर्यंत 10 ते 11 तास किमान लागतात त्यामुळे या काळात ते फक्त घोट घोट पाणी पितात. 

अशी होते कोकेनची तस्करी 

कोकेनची निर्मिती मुख्य करून लॅटीन अमेरिकन देशात होते. तेथून ते ब्राझीलमधे आणले जाते. ब्राझीलमधून ते आफ्रिकेतील लोगोस अथवा लोमो येथे आणले जाते. तेथे हे ड्रग्स छोट्या कॅप्सूलमध्ये भरून ते भारतात आणले जाते. पूर्वी नायजेरीन तस्कर स्वतः जीवावर उदार होऊन हे ड्रग्स पोटात लपवून आणायचे. पण सुरक्षा यंत्रणा त्यांची अधिक तपासणी करू लागल्यामुळे आता हे तस्कर स्वतः धोका न पत्करता दक्षिण अमेरिकेतील छोट्या देशातील नागरीकांनमार्फत कोकेन भारतात पाठवतात. अदीस अबाबा या विमानतळावरून मोठ्याप्रमाणात तस्करी होत आहे. त्यानंतर राज्यासह गोव्यामध्ये त्याचे वितरण केले जाते. 

मुंबईतील नायजेरियन तस्करांची वाढती मक्तेदारी 

मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, तर नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. या नायजेरीयन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन, अशा अनेक नव्या अमलीपदार्थांची तस्करी भारतात सुरु केल्याने या नव्या अमली पदार्थाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. बेकायदेशीर रित्या भारतात आलेले 95 टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात. 

Web Title: marathi news nigerians are now using poor latin americans for their dirty business of drugs


संबंधित बातम्या

Saam TV Live