Lockdown Effect | रात्रीच्या संचारबंदीचे व्यवसायिकांवर परिणाम

साम टीव्ही
बुधवार, 23 डिसेंबर 2020
  • महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी 
  • सरकारच्या निर्णयामुळे व्यावसायिक नाराज
  • संचारबंदीवर तोडग्याची मागणी

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्यात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलीय. पण त्यामुळे व्यावसायिक नाराज झालेत. पाहूयात एक रिपोर्ट

ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने राज्य सरकारने 13 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनने नाराजी व्यक्त केलीय...या संचारबंदीचा मोठा फटका रिटेल दुकानदारांना बसेल असं असोसिएशनचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांनीही सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. कोरोनाच्या काळातल्या निर्बंधांमुळे अगोदरच व्यावसायिकांचं कंबरडं मोडलंय. त्यातच ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने बाजारात पुन्हा तेजी येण्याची शक्यता होती. मात्र, राज्य सरकारच्या नाईट कर्फ्युच्या निर्णयामुळे व्यावसायिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं गेलंय. त्यामुळे या संचारबंदीवर तोडगा काढण्याची मागणी केली जातेय.


संबंधित बातम्या

Saam TV Live