निलेश राणेंची रामदास कदमांवर जहरी टीका

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

मुंबई : सोमवारी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांची नाराजी दिसून आली. त्यातच शिवसेनेचे रामदास कदमांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळं ते नाराज असल्याचं दिसताच, माजी खासदार निलेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 

काय म्हणाले निलेश राणे?

'आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचात. पण आज तुम्हाला आम्ही उलट शिवी घालणार नाही कारण न घालताच ती तुम्हाला बसलेली आहे,' अशी जहरी टीका राणेंनी कदमांवर केली आहे. 

'रामदास कदम, तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खूश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा. पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालताच ती तुम्हाला बसलेली आहे.' असे ट्विट करत राणेंनी कदमांसह उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकस्त्र सोडलंय.

नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलाय. त्यात बऱ्यापैकी तरुम चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. यासह निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार व तीन अपक्षांनाही शिवसेनेनं आपल्या कोट्यातून मंत्रीपद दिलं आहे. त्यासाठी सेनेतील ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यात दिवाकर रावते यांच्याबरोबरच रामदास कदम यांचाही समावेश आहे. त्यामुळं ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. 

याच संधीचा फायदा घेऊन निलेश राणेंनी रामदास कदमांवर निशाणा साधलाय. आणि ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि रामदास कदम यांना चांगलंच सुनावलंय. 

Web Title - Nilesh rane criticise on ramdas kadam and cm.

संबंधित बातम्या

Saam TV Live