(व्हिडिओ) बाळासाहेबांकडून आनंद दिघेंची हत्या : निलेश राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

रत्नागिरी - नारायण राणे हे माझ्यासाठी साहेब आहेत. त्यांच्यावर कुणीही ऐरागैरा खासदार आणि आमदार जाहीर टीका करत असेल तर आम्हालाही शिवसेनाप्रमुखांची परिस्थिती जाहीर सभेतच उघड करावी लागेल, असे सांगत स्वाभिमानचे सरचिटणीस नीलेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. दिघेंना किती त्रास दिला, सोनू निगम प्रकरण उघड करू, असा इशारा नीलेश राणे यांनी दिला. वाटदमधील शिवसेनेच्या सभेत खासदार राऊतांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला नीलेश यांनी पत्रकार परिषदेत सणसणीत उत्तर दिले. 

ते म्हणाले, 'राणेंवर गुन्हेगारीचे आरोप करता तर साडेचार वर्षे गृहखाते शिवसेनेकडे आहे. मग तपास का नाही केला? आम्ही मर्यादा पाळली, बाळासाहेबांबद्दल बोललो नव्हतो. पण नारायण राणेंवर जर राऊत बोलले तर ऐकून घेणार नाही. आनंद दिघेचे काय झाले? ज्या शिवसैनिकांना ते कळाले त्यांचे काय झाले? हे जाहीर करू. खासदार राऊतांनी मर्यादेत राहावे. आतापर्यंत ठाकरे घराण्यामध्ये कधी शिरलो नव्हतो. पण तुम्ही राणेंवर काहीही बोलणार असाल तर ठाकरे घराण्याला वाचवण्यासाठी सावध व्हा.''

ते म्हणाले, 'सोनू निगम, ठाकरे घराण्याचे काय नाते होते हे सांगायला कमी करणार नाही. नारायण राणे नेहमीच फ्रंटफूटवर खेळतात. इतिहासात जायचे असेल तर इतिहास दोन्ही बाजूचा असतो. आम्हाला ठाकरे घरण्याचे सत्य सांगावे लागले. जयदेव ठाकरे न्यायालयात काय बोलले ते सांगायला लावू नका. ते सांगितले तर अवघड होईल.'' 

राऊतांना मांडीवर खेळवायचे सोडा 
"कणकवलीत येऊन फटाके वाजवायची वेळ तुमच्यावर येणार नाही. निवडणुकीनंतर आम्ही पालीत कसे फटाके उडवतो, ते बघा. खासदार राऊतांना मांडीवर खेळवायचे आमदारांनी सोडावे. डांबर घोटाळ्याची चौकशी लागणार आहे. डांबरातील भ्रष्टाचाराचा खरा चेहरा समोर आणू, असे नीलेश राणे म्हणाले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live