कोरोनामुक्त झालेल्यांची फुप्फुस खराब होतात? चीनमधील संशोधकांची धक्कादायक माहिती

साम टीव्ही
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020
  • वुहानमधल्या 90 टक्के कोरोनामुक्तांची फुप्फुसं खराब
  • चीनमधल्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
  • कोरोना ठरतोय फुप्फुसं खराब करण्याचं मोठं कारण

कोरोनामुक्त झालं म्हणजे सुटलो असं अनेकजण समजतात. मात्र कोरोना हा दीर्घकाळ सोबत राहतो, असं आता संशोधनातून समोर आलंय. पण कोरोना एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्यानं कोरोनाग्रस्तांच्या फुप्फुसांना लक्ष्य केलंय. काय घडतंय असं. पाहा - 

कोरोनाचा परिणाम थेट फुफुसांवर होतो हे आधीच समोर आलंय. मात्र जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्याची फुप्फुसं खराब झाल्याचंही आता समोर आलंय. जिथून कोरोनानं आपली पायंमुळं जगभर पसरवली, त्या वुहानमध्येच हे संशोधन करण्यात केलं गेलंय. ज्यामध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या तब्बल 90 टक्के लोकांची फुफुसं खराब झाल्याचं समोर आलंय.

वुहानमधल्या कोरोनामुक्त झालेल्या 100 रुग्णांवर संशोधन केलं गेलं, या रुग्णांचं सरासरी वय 59 वर्ष होतं. यामधल्या 90 टक्के रुग्णांची फुफुसं पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलं. 

या रुग्णांचं फुप्फुसाचं व्हेंटीलेशन आणि गॅस एक्सचेंट फंक्शन योग्य पद्धतीनं काम करत नाही

  • जिथं सामान्य व्यक्ती 6 मिनिटांत 500 मीटरहुन अधिक चालतो, तिथं कोरोनातून बरा झालेल्या व्यक्ती 400 मीटरही चालू शकत नाही
  • काही रुग्णांना बरे होऊन 3 महिने उलटले तरी त्यांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज लागते
  • तर 100 मधल्या 10 रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज संपुष्टात आल्याचं समोर आलंय.
  • काही रुग्ण तर कोरोना न्युक्लिक चाचणीत निगेटीव्ह दिसतात..मात्र हेच रुग्ण इम्युनोग्लोब्युलिन चाचणीत ते पॉझिटीव्ह असल्याचं समोर आलं. त्यामुळं अशा रुग्णांना पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागलंय.
    कोरोना हा दिसतो तितका सरळ साधा आणि सोपा आजार नाही. त्याचे दुरगामी परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनावरुन स्पष्ट होतंय..त्यामुळं सोशल डिस्टंसिंग आणि आपली काळजी घेऊन कोरोनापासून दूर राहिलेलंच बरं.


संबंधित बातम्या

Saam TV Live