‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट

‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट

सावंतवाडी - निपाह व्हायरस जिल्ह्याच्या सीमेवर येताच जिल्हा यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. सिंधुदुर्गात कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आता जिल्हा आरोग्यसह पशुसंवर्धन यंत्रणा युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. जिल्ह्यात वटवाघळाचे असित्व आहे त्याठिकाणी सोडीअम बायकार्बोनेट आणि सोिडअम हायपोक्‍लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.

गोव्या सीमेवर तपासणी दरम्यान केरळहून आलेला एक संशयित रुग्ण सापडला होता. याच पार्श्‍वभूमीवर पशुसंर्वधन राज्य उपायुक्तानी तातडीची बैठक बोलावून महाराष्ट्रात याचा प्रसार होऊ, नये यासाठी विशेषतः सिंधुदुर्गातील पशुसंवर्धन विभागाला या औषधांची फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘‘निपाह हा वटवाघळा मार्फत पसरणारा आजार असल्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांनी सावधगिरीच बाळगणे उचित आहे. तपासणी केलेल्या डुकरामध्ये अद्याप कोणतेही आजारपणाची लक्षणे आढळली नाहीत; मात्र आम्ही आजार न पसरण्याबाबत दक्ष आहोत.’’
- विद्यानंद देसाई, पशुधनविकास अधिकारी

याबाबत बैठका बोलावून झालेल्या कार्यवाहीबाबतची माहिती उचस्तरावरुन घेण्यात येत आहेत. पशुसंवर्धन आयुक्तानी यासाठी वनविभाग, आरोग्यविभाग व ग्रामपंचायत यानाही आपल्या कार्यवाहीमध्ये सामावून एकत्रित काम करण्याचे सुचविले आहे.

डुक्कराजवळही निपाहचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे सर्वच यंत्रणा वराह पालन होत असल्याठिकाणी सतर्क झाली आहे. 

अशा ठिकाणी पशुसंवर्धन विभागाकडून भेटी घेऊन त्याठिकाणचे नमूने घेऊन ते पुणे येथे संबंधित विभागाकडे नुकतेच पाठविण्यात आले. ज्याठिकाणी पशुसंवर्धन विभागाने आजगाव, भोम, निरवडे, तळवडे, शिरोडा, विलवडे आदी ठिकाणी जावून डूकरात आजारी असल्याची कोणतेही लक्षणे आहेत की नाही किंवा अन्य कोणती वेगळी लक्षणे याचीही पहाणी करण्यास सुरवात केली आहे. पीगरी (वराहपालन फार्म) यांनाही पशुसंवर्धन विभागाकडून भेटी देण्यात आल्या.

अशी घ्या काळजी

  •     झाडाखाली पडलेली फळे खाऊ नये
  •     वटवाघळ असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
  •     डुक्कर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com